Hot Posts

6/recent/ticker-posts

कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा बंद; नदीपात्रातील विसर्ग घटला

 


कोयनानगर, दि. २० : कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उघडण्यात आलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे आज, २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे सांडव्यावरून कोयना नदीपात्रात होणारा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.

दरवाजे एक फुटावरून पूर्णपणे खाली आणण्यात आल्याने सांडव्याचा विसर्ग बंद झाला आहे. मात्र, कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्यातून १ हजार ५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.

त्यामुळे सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद झाल्यानंतर नदीपात्रातील एकूण विसर्ग आता १,०५० क्युसेक इतका राहिला आहे.

गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. परिस्थितीनुसार विसर्गात वाढ-कपात करण्यात आली. आता पाण्याची परिस्थिती नियंत्रणात आल्याने सांडव्यावरील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

कोयना धरणाचे सहा दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याने नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या