कराड : गुन्ह्यात दोषी ठरून न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस कराड तालुका पोलिसांनी अटक केली. दत्ताराम सिताराम शेलार (वय ५०, रा. अभयाचीवाडी, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी शेलार यास कराड येथील सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील कलम ४९८(अ) अन्वये तीन वर्षे आणि कलम ३०६ अन्वये पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, शिक्षा सुनावल्यानंतर तो फरार झाला होता.
पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. अखेर १८ ऑगस्ट २०२६ रोजी कराड तालुका पोलिसांनी शिताफीने त्याचा ठावठिकाणा शोधून त्यास अटक केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीस उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मदने, पोलीस हवालदार पवार (२३९३), पोलीस शिपाई खंदारे (५९), महिला पोलीस शिपाई पाटील (११२०) आणि पोलीस शिपाई खुस्पे (८७८) यांनी केली.

0 टिप्पण्या